"द फर्म" ही सुप्रसिद्ध अमेरिकी लेखक (जे पेशाने अनेक वर्ष वकील होते) यांची पहिली आणि गाजलेली कादंबरी.
मनी लाँड्रिंग, गुप्त खाती ज्यात खातेदाराच्या शारीरिक वर्णनानुसार आणि कोडवर्ड्स वर बँक व्यवहार होतात, मोरल्टो माफिया फॅमिली, गुन्हेगारीच्या पैशाचे बेमालूमपणे पांढरे करण्याचा व्यवसाय करणारी बेन्डिनी ही वकिली फर्म... आणि हे लोकं त्यांच्या दुर्दैवाने २००० अर्ज छानून हार्वर्ड मधून उत्तम गुणांनी वकिलीची परिक्षा पास झालेला मीच वाय. मॅकडिअर याला फर्म मध्ये रुजू करवून घेतात आणि कथानकाला सुरवात होते.
कथानक भरपूर वळणं घेते आणि अखेरीस माफिया फॅमिलीला शिक्षा होते. एफबीआयचा सरकारी ढिसाळ तपास, मीच आणि त्याची सुंदर बायको ऍबी, अनेक भाषा येणारा त्याचा भाऊ रे, त्याचे सहकारी क्वीन, लामार, लॅम्बर्ट डीवॉशर आणि बॉस अव्होरी यांच्या भोवती कथानक फिरत राहते आणि प्रत्येक पानावर उत्कंठावर्धक होत जाते. वेन टेरेन्स याची एफबीआय अधिकाऱ्याची भूमिका छान रंगवली आहे लेखकाने.
