२/२०२६ #marathibookreview
"इराणच्या गुप्त नोंदी / Secret Notes from Iran" हे १८० पानांचे पुस्तक नावामुळे उचलले. खरं तर या पुस्तकात कोणत्याही गुप्त/सीक्रेट माहिती दडवली नाहीये 😃. हे पुस्तक फार तर इराण सहलीवर गेलेल्या एखाद्या सामान्य भारतीयाने लिहिलेली निरीक्षणे म्हणता येईल.
लेखक नदीम सिराज (अनुवादक प्रसाद साळवी) यांनी ९ प्रकरणात या पुस्तकाची विभागणी केली आहे. तेल आणि पेट्रोडॉलर याचा रंजक प्रवास सांगताना लेखकाने १९७९ च्या इराणी क्रांती पासून खेमेनी पर्यंत इराण अमेरिका संबंधांचा संक्षिप्त आढावा घेतला आहे. बहुचर्चित हिजाब विरोधी चळवळीविषयी एक छान प्रकरण लिहिले आहे. अमेरिकी दूतावासाला अमेरिकेविषयी तिरस्कार होईल अशा कलाकृती ठेवल्याचे वाचून आश्चर्य वाटले.
भारत इराण संबंध, इराणी जनतेचे बॉलिवूड वरील निस्सिम प्रेम आणि चाबहार बंदर यावरील लेखन विशेष भावले.
ना लेखक दडून बसला होता, ना त्याच्या नोंदी काही गुप्त स्वरूपाच्या आहेत. ज्याप्रमाणे लेखक अमेरिकेच्या प्रोपोगेंडा विषयी बोलतो, तसे हे पुस्तक इराणचा प्रोपोगेंडा म्हणू शकतो😃

No comments:
Post a Comment