#filmfareJan2026 #3/2026
जवळपास दोनदशकांनंतर फिल्मफेअर हातात घेतले आणि बॉलीवूडशी पुन्हा जुळवायचं मनावर घेतले😃.
डिसेंबर जानेवारीच्या या अंकात कार्तिक आर्यन या नायकाचा फोटो आहे कारण त्याचीच मुलाखत आत फोकस ठेऊन छापली आहे. "सोनू के टीटू की स्विटी" या एकदा विमानात मी कधी काळी पाहिलेल्या छपरी चित्रपटाचा हिरो हा कार्तिक होता हे आज समजले. बाकी इंटरव्ह्यू सुमार दर्जाचा होता, कारण तो फक्त कार्तिकचा अनन्या पांडेबरोबर येऊ घातलेल्या "तू मेरा मै तेरी" चित्रपटाच्या निर्मात्याने स्पॉन्सर केलेला असावा. अनिल कपूरच्या सोफ्यावर जाऊन गप्पा मारू शकतो ही याची achievement.
याखेरीज प्रियांका चोप्रा आणि विशेषतः फरहान अख्तर, तमन्ना भाटिया यांचे इंटरव्ह्यू मला आवडले. सई महेश मांजरेकरने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर फिनलंड आणि स्वीडन फिरून आली, तेथील प्रवासवर्णन केले आहे, छान आहे. फॅशन डिझायनर आश्ले रिबेलो सांगतो की तुम्ही बुटके असाल, तर सेम कलरचे शर्ट पँट घाला (टोन टू टोन स्टाईल)ज्याने तुम्ही उंच आणि स्लिम दिसता.
१०० करोड क्लबमध्ये गेल्यावर्षी १० चित्रपट गेले, त्यातला मी एकही पहिला नाही हे समजल्यावर कधी काळी झाडून सगळे चित्रपट पाहणाऱ्या फॅनला किती अंतर कापावे लागणार आहे, याचा अंदाज आला😃.
धर्मेंद्रच्या फिल्म करिअरचा आढावा चांगला लिहला आहे. OTT स्टार्सना आता फिल्मफेअरमध्ये स्थान मिळते आहे, हे वाचून आनंद वाटला.
मात्र या अंकात सर्वात जास्त आनंद घेतला तो "कपूर अँड सन्स" खानदानातील आदित्यराज शम्मी कपूर (जे इंडस्ट्री मध्ये नाहीयेत) यांचा लेखक फरहाना फारुक यांनी घेतलेला इंटरव्ह्यू, ज्यात कपूर खानदानातील अनेक सुरस कहाण्या समोर आल्यात. गीता बालीचा अकाली मृत्यू ही खरोखरीच इंडस्ट्रीची शोककथा होती. कपूर फॅमिलीचा फोटो पाहून छान वाटले .. पण सैफ अली तेवढा त्यात खटकत राहतो आपल्याला 😃.

No comments:
Post a Comment