#marathibookreview #50/2025
"तो माझा मुलगा आहे त्रिपुरे... बाहेरून युवराज कुणिक कुटुंबवत्सल वाटत असला तरी आतून 'किती विध्वंसक'आहे हे माझ्या मनाला पूर्ण माहितेय. तो भारतवर्षात रक्ताचे पाट वाहिल, माझा मुलगा आहे तो, मी त्याला आतून बाहेरून चांगलाच ओळखते"😀 (~ महाराणी चेलना)
सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या भारतवर्षात मगध साम्राज्याच्या सिंहासनाला अक्षरशः रक्ताभिषेक घालून गादीवर बसणाऱ्या सम्राट अजातशत्रूची ही गोष्ट!!
प्रत्येक पानावर धक्का देणारे, अस्वस्थ करणारे, सतत पुढे काय असा भुंगा डोक्यात सोडणारे "अजातशत्रू" हे २८० पानांचे पुस्तक या वर्षातील मला सर्वात जास्त भावलेले पुस्तक. सुमेध नावाचा हा तरुण लेखक मराठीला लाभला हे आपले भाग्यच. खरं तर इंग्रजीसहीत भारतातील सर्व प्रमुख भाषांमध्ये अनुवादित केलीच पाहिजे इतकी ताकदवान ही कादंबरी झाली आहे.
अत्यंत ओघवत्या शैलीत लिहलेली ही कादंबरी वाचताना रक्तकंठ अश्वाचा (ज्याच्या प्रतिशोधात हा रक्तरंजित प्रवास सुरू होतो) जेंव्हा जेव्हा उल्लेख होतो तेंव्हा मात्र वाचकाला हळहळ नक्कीच वाटते!
प्रत्येकाने १००% वाचावे असे हे अफलातून पुस्तक आहे.

No comments:
Post a Comment