Monday, March 9, 2026

#६३ आत्म्याचा प्रवास आणि मृत्यूपश्चात जीवन - लेखक मेधा खाजगीवाले

#marathibookreview #10/2026

"आत्म्याचा प्रवास आणि मृत्यूपश्चात जीवन" हे कोणा एकाच्या सांगण्यावरून पुस्तक मागवले. यायला उशीर झाला... पण वाचल्यावर आलेच नसते तर फार बरे झाले असते असे वाटले. इतके तडीपार पुस्तक तुमचे नशीब फुटके असल्यावरच नशिबी येते.

प्राण, जीवात्मा, आत्मा, देह  अशा अगाध ग्यानबिड्या पहिल्या काही प्रकरणात लेखिका मेघा खाजगीवाले (पीएचडी) यांनी फुकल्या आहेत, त्यावरून या विषयावरचे माझे कुतूहल पूर्णपणे मारण्यात आले आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी🤦🏻‍♂️😭.
मरताना कसे वाटते, मृत्यू जवळ आल्यावर किंव्हा पाच मिनिटे होऊन गेल्यावर कसे वाटते, पुनर्जन्म या विषयांवरच्या कहाण्या लेखिकेने १६८ पानांच्या पुस्तकात पेरल्या आहेत. उगाच अवजड आणि शास्त्रीय शब्द फेकतानाच लेखिकेने फॉरेन मधले काही फुटकळ शास्त्रज्ञांचा आणि त्यांच्या बेरोजगार प्रयोगांचा निष्कर्ष देऊन आपल्या पीएचडी डिग्री chatgpt वाली नाही हे पटवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.👏🏼🤷🏽.

असो, एकंदरीत पुढच्या जन्मात देखील वाचू नये असे हे पुस्तक 🫡

No comments:

Post a Comment