Friday, March 20, 2026

#६५ द्रष्टा - लेखिका वीणा गवाणकर

#marathibookreview #12/2026

हेन्री डेव्हिड थोरो हे अठराव्या शतकातील प्रसिद्ध निसर्गप्रेमी आणि साध्या राहणीचे तत्त्वचिंतक. ख्यातनाम लेखिका वीणा गवाणकर यांनी नेहमीप्रमाणेच खूप जास्त अभ्यास करून या स्वयंभू माणसाचे जीवनचरित्र लिहिले आहे.

वीणाताई गावणकरांची सोपी आणि साधी लेखनशैली वाचकांना नेहमीच आकर्षित करते... पण मी मात्र त्यांच्या सर्वच पुस्तकांची "एक होता कार्व्हर " सोबत तुलना करतो आणि सगळ्यांना खालचे मानांकन देतो...हा वाचकाचा दोष सोडून द्या.

पण "द्रष्टा" या नवीन पुस्तकात लेखिकेने डेव्हिड हेन्री थोरो या अतींद्रियवादी (Transcendentalist) लेखकाचा लहान पानापासून ते मृत्यूपर्यंतचा रानावनातला जीवन प्रवास सुरेख रेखाटला आहे. पहिल्या पानापासून २०८ पानात लेखिका तुम्हाला अठराव्या शतकातल्या शांत आणि निसर्गाच्या लयीत जगण्याची अनुभूती देते 😃. "वूड बर्नर" ची त्यांना मिळालेली उपाधी, थोरो यांचे काँकोर्डच्या तुरुंगातील वास्तव्य आणि दंडाची रक्कम भरण्यास दिलेला नकार या घटना रंजक वाटल्या.
हे पुस्तक थोरो यांच्या जीवनशैलीप्रमाणेच शांत आणि साधे असल्याने वाचताना थोडा जास्त पेशंस ठेवावा लागला, इतकीच काय ती खर्चाची बाजू.

No comments:

Post a Comment