"माधोरुबागन" या तमिळ भाषेतल्या खळबळजनक कादंबरीचा अनुवाद वाचला आणि निःशब्द झालो.
या पुस्तकाच्या वादामुळे उद्विग्न झाल्यावर "माझ्यातील लेखक मेला आहे" असे घोषित करणारे ख्यातनाम लेखक पेरूमल मुरुगन यांनी या पुस्तकात समाजातील "मूल नसलेले आईवडील" या संवेदनशील विषयाला हात घातला आहे. "वन पार्ट वूमन" हा या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद, जो प्रणव सखदेव या लेखकाने मराठीत भाषांतरित केला आहे.
कालि आणि पोण्णा हे दाम्पत्य मूल होण्यासाठी जंग जंग पछाडतात, समाजातून होणाऱ्या सततच्या अवहेलना आणि कुत्सित टोमण्यांना तोंड देतात. कालि आणि पोण्णा यांच्या जोडीला वाचकांबरोबरच कालिचा मेव्हणा मुथु आणि काका नल्लायान या पात्रांना देखील या दाम्पत्याच्या आयुष्यात बाळाचे सुख मिळावे हे प्रत्येक पानावर वाटते.
सगळे मार्ग संपल्यावर मुथुने समाजमान्य उपाय करण्याचा घाट घातला... पण त्यावर पोण्णा चालली का?? प्रत्येक प्रकरणात ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवते आणि२३६ व्या शेवटच्या पानावर आणि त्याच्या आधीच्या १५ पानांवर कथानक ज्या वळणावर येते त्याने वाचकांना अस्वस्थ व्हायला येते.

No comments:
Post a Comment