#marathibookreview
जपानी काईझेन प्रणालीचे भारतीयकरण करणारे श्याम तळवडेकर यांचे "सूर्य दोनदा उगवला" हे पुस्तक वाचले. समस्येचे मूळ शोधणे...कोण चुकीचे आहे, या पेक्षा काय चुकले आहे, का चुकते आहे आणि त्यात काय बदल घडवणे आवश्यक आहेत, आणि ते बदल प्रत्यक्षात उतरवून उत्तम वस्तू/सेवा ग्राहकास उपलब्ध करून देणे, हे काईझेन तंत्राने अनेक व्यवसायांनी /उद्योगांनी यशस्वी करून दाखवले आहे.
१७६ पानी या पुस्तकात लेखकाने सोप्या भाषेत, रोजच्या भारतीय व्यवहारातील उदाहरणे देऊन काईझेन ही जीवनप्रणाली कशी उपयुक्त होऊ शकते याची मीमांसा केली आहे.
वाचनीय पुस्तक आणि अनुकरणीय संकल्पना!

No comments:
Post a Comment