#marathibookreview
"प्रेसिडंक" हा मिस फ्लोरेंटिना रोसनोवस्की हिने उच्चारलेला पहिला शब्द!!
स्थलांतरित पोलिश बिजनेसमन एबल रोसनोवस्की आणि मिसेस झाफिया यांची एकुलती एक मुलगी, गव्हर्नेस मिस डब्ल्यू. ट्रेडगोल्ड यांच्या शिस्तीने मोठी झालेल्या फ्लोरेंटिनाचा अमेरेकीच्या राष्ट्राध्यक्ष पदाला पोचण्याचा थक्क करणारा प्रवास जगप्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांच्या "द प्रोडिगल डॉटर" या कादंबरीत रेखाटला आहे!!
मध्यंतरापर्यंत एबल रोसनोवस्की आणि विल्यम केन यांच्यातील लेस्टर्स बँकेच्या नियंत्रणामुळे झालेल्या अनेक दशकांच्या खानदानी दुश्मनीला फ्लोरेंटिना उर्फ जेसी आणि हार्वर्ड विभूषित रिचर्ड केन यांच्या प्रेमप्रकरणाने, लग्नाने पूर्णविराम मिळाला, मग फ्लोरेंटिनाज फॅशन शॉप, शिकागो बॅरेन ग्रुप आणि लेस्टर बँक एकामागोमाग एक यशाची शिखरे पादाक्रांत करू लागले.
४३० पानांच्या या पुस्तकात एकमेकांचा विनाश करण्यासाठी झपाटलेली एबल आणि केन यांची झुंज प्रवृत्ती घेऊन फ्लोरेंटिना, तिच्या सौंदर्य, ऊर्जा आणि त्याहूनही जास्त अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अमेरिकेची पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवते असा कथेचा शेवट होतो.
एकदाही कंटाळवाणी न वाटणारी ही कादंबरी एबल ॲन्ड केन या कादंबरीची सिक्वेल आहे. खास दोस्त एडवर्ड आणि बेला यांच्या पात्रांनी कथेत मजा आणली. पती रिचर्ड यांचे अकाली निधन धक्का देते, पण जिच्यासाठी आयुष्यभर वाट पाहणारा खरा दोस्त एडवर्ड याला "फर्स्ट जेंटलमॅन ऑफ युनायटेड स्टेट्स" हा बहुमान शेवटच्या पानावर प्रेसिडेंट फ्लोरेंटिना देते याचा आनंद वाटतो.
बाकी अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष महिला फक्त कल्पनेत आणि कादंबरीतच होऊ शकते हे आतापर्यंत जगाला समजले असेलच😁. अर्थात २०२५ साली अमेरिकेला चान्स मिळाला होता कमळाबाईंना राष्ट्राध्यक्षाचा मुगुट घालायचा... पण इथे कोथरूडात बसून माझ्यासारख्या कट्टर रिपब्लिकन समर्थकांनी तात्यांना निवडून दिले आणि ......

No comments:
Post a Comment