#marathibookreview #17/2025
फॅक्टरी गर्ल्स (लेखिका - लेस्ली टी. चांग, अनुवाद - गौरी देशपांडे) हे यावर्षातील सतरावे मराठी पुस्तक!
चीनमधील कारखाना कामगार महिलांच्या खेड्यातून शहराकडे स्थलांतरित जीवनावर आधारित अनेक कथा लेखिकेने रेखाटल्या आहेत. चायनामध्ये ९० च्याच दशकात ज्या झपाट्याने औद्योगीकरण झाले, त्यात कामगारांचे कसे शोषण झाले यावर पुस्तक प्रकाश टाकते. डोंगगुआनच्या कारखान्यांमधील तरुणींचे संघर्ष आणि आकांक्षा दाखवताना अनेक कथा रटाळ आणि जास्त तपशीलपूर्ण वाटतात (कदाचित अमेरिकी लेखक खूप जास्त डिटेलिंग करतात त्यामुळे स्टोरी हरवते असा माझा बरेचवेळेचा अनुभव आहे). पुस्तक जागतिक अर्थव्यवस्थेतील त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकते, पण त्यात नवीन काही वाटले नाही. मुळात, त्या चपट्या जिंग्यांच्या (#मुडदा-बाशिवला चीनचा 😡) देशाचे मला फार कौतुक नाही. काहींना हे पुस्तक प्रेरणादायी वाटले असले तरी सतत फिरणाऱ्या कथा वाचकांनाच हरवून टाकते, असे मला वाटले.

No comments:
Post a Comment