जरी मी मिस वर्ल्ड मनुषी चिल्लरवर मागे एकदा उपहासात्मक पोस्ट लिहिली असली, तरी माझी तिच्याबद्दल तक्रार नसून मिस वर्ल्ड स्पर्धेच्या आयोजनाबद्दल होती.
What would you do to save the world? या इरा त्रिवेदी लेखिकेने लिहिलेल्या पुस्तकाने माझे या स्पर्धेविषयी असलेले गैरसमज दूर झाले. २८४ पानांच्या या पुस्तकात मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झालेली कॉन्टेस्टंट नंबर सेव्हन - मिस रिया (नावांची पात्रे लेखिकेने काल्पनिक केली आहेत) हिचा (स्वतःचाच) या स्पर्धेतील "अयशस्वी" प्रवास रेखाटला आहे. तेवीस जणीत निवड झालेल्या भावी हिऱ्याची मुगुटधारी रियाच्या ३० दिवसाचा "खडतर प्रवास" (जो खरं तर माझ्या आणि अनन्या पांडेच्या लाइफ स्ट्रगलला देखील लाजवेल असाच आहे🫤😐) या स्पर्धेत निवड होण्याच्या, स्वीम सूट राऊंड - नाइट गाऊन राऊंड - आदर्श प्रश्न उत्तर राऊंड या प्रशिक्षणाच्या प्रक्रियेवर दीर्घ प्रकाश टाकते. मजेशीर गोष्ट म्हणजे प्रत्येक पानावर लेखिका इतर सर्व सहभागी स्पर्धक, आयोजक, रॅम्प वॉक, डाएट, स्कीन ग्लो करण्याचे एक्स्पर्ट, मेकअप आर्टिस्ट, डायनिंग एटिकेट्स तज्ञ, पेज थ्री एटिकेट गुरु, ब्युटी क्वीनचे स्माईल हत्यार कसे वापरायचे आणि अशा अनेक विषयातले तज्ञ, परीक्षक, प्रेक्षक.... या सर्वांचीच लायकी काढते🤷. अर्थात लेखिकेने पुस्तक लिहिले तेंव्हा तिचे वय वर्ष केवळ बावीस होते, त्यामुळे आपण सोडून दुनिया सुटिया वाटण्याचेच ते वय. अवहेलना, पराभव, अपमान, भीती, हाराकिरी या सगळ्याचा पुढच्या काही वर्षात अनुभव आला की " तुम्हारी औकात क्या है " हे आपल्यालाही समजतेच की... तिलाही नक्की कळले असेलच.
आणि मग तिने या स्पर्धेत सेमी फायनलच्या दहा जणीत देखील निवड न होऊन काय मिळवले .... आणि बॉस्टनच्या कॉलेजात इकॉनॉमिक्स शिकली म्हणून टिमकी मारणारी रिया शेवटी 'गेनबा सोपानराव मोझे' महाविद्यालयात एमए अर्थशास्त्राची डिग्री घेणाऱ्या माझ्यासारख्याने काय गमावले हे देखील शिकेल 😁.
अपर्णा वेलणकर यांनी मराठीत "ब्युटी क्वीन" नावाने या पुस्तकाचा केलेला अनुवाद स्पर्धकांच्या दुनियेतील "फिल" देतो.
बाकी हडकुळी, भरपूर व्यायाम करणारी आणि सुंदर दिसणारी असलात, तरी उंची किमान ५"६ पाहिजे असा मराठी सौंदर्यवतींना नेहमीप्रमाणे झगमगत्या विश्वात वंचित ठेवण्यासाठीचा जागतिक कडक नियम आहेच 🫤😐.

No comments:
Post a Comment