#marathibookreview
कोव्हीड काळात शोषण मीडियावर सर्वच विचारवंतानी बस्तान बसवले, नास्तिक लोकांनी त्यांचे देखील अस्तित्व निर्माण केले आणि त्यातूनच ब्राईट्स नावाची नास्तिक्याचा प्रचार करण्यासाठी संस्था जन्माला आली. नास्तिक समविचारी लोकांचा कळप कुमार नागे या माणसाने जमवला, त्यातून गेल्यावर्षी "तर्कटपंजरी" हे पुस्तक संपादित झाले. १६६ पानांचे पुस्तक तीन भागात विभागले आहे. पहिल्या भागात ब्राईट्स संस्थेचे सर्वेसर्वा कुमार नागे यांनी संस्थेच्या जन्माची कहाणी सांगितली आहे, नास्तिकत्वाचा प्रचार करण्याची त्यांचा उद्देश सोप्या शब्दात लिहिला आहे. एकंदरीत नागे सरांकडे नक्कीच दूरदृष्टी असल्याचे वाचकांना समजते. त्यानंतर निखिल जोशी यांनी "आम्ही नास्तिक का आहोत?" या विषयावर ३ पॅरा लिहिले आणि मग ब्राईट्स संस्थेच्या नावातला b हा upper case का नाही आणि lower case का ठेवला, अशी काहीतरी बाकचोडी खरडली आहे. जगदीश काबरे सदानकदा शोषण मीडियावर आस्तिक लोकांशी हाणामाऱ्या करतात, पण त्यांच्या विचारात देखील स्पष्टता वाटली.
दुसऱ्या भागात जवळ पास ३४ लेखकांनी आपल्या नास्तिक्याच्या प्रवासावर लेख लिहिले आहे. सगळ्यांची सगळीच मते पटणारा ज्येष्ठ कंपाऊंडवादी या नात्याने माझे निरीक्षण असे -
१) यातील बहुसंख्य लेखकांना घरामध्ये पूजाअर्चा, हिंदू सण, कर्मठ कांड, रितीरिवाज यांचा वैताग आल्यानेच ते नास्तिक संघटनेकडे ओढले गेले असावेत.
२) हे सगळेच लेखक मला साधे भोळे, सरळमार्गी वाटले, आतमधला कर्मकांडाविरुद्धचा आवाज त्यांना कुठे तरी बाहेर काढायचा होता, त्याला व्यासपीठ मिळाले.
३) ज्याप्रमाणे भाजपने काँग्रेसमधील लोकं आयात केले, त्याचप्रमाणे अंनिस मधल्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी ब्राईट्समध्ये प्रवेश केला. दाभोळकरांची अंनिस शोषण मीडियावर अजूनही अस्तित्व निर्माण करू शकली नाहीये, त्यामुळेच या कार्यकर्त्यांना आतल्या तुंबलेल्या भावना बाहेर काढण्यासाठी ब्राईट्स हा प्लॅटफॉर्म मिळाला आहे.
४) काही लेख हास्यास्पद आहेत, मी तर म्हणतो त्या जोश्याने आपल्या फेसबुक समर्थकांना उगाच काही तरी खरडायला लावले आहे. उदा. कोणीतरी परांजपे नावाच्या बाईने आपण सदाशिव पेठेत राहत असूनही लहानपणापासूनच कट्टर नास्तिक कशी होती ही टिमकी मिरवता मिरवता, शेवट घरच्यांच्या दबावामुळे वास्तुशांत करावी लागली लिहिते...काय सुटियागिरी आहे ही😒.
५) अनेक लेखांमधील भाषा इतकी अवघड आहे की माझासुद्धा मराठीमध्ये उमर अकमल झाला. त्यामुळे नक्की संस्थेचा audience कोण आहे हे समजत नाही.
तिसऱ्या भागात २०१४ च्या नास्तिक परिषदेतील भाषणे छापली आहे. यायला, इथे पण तो अच्युत गोडबोल्या घुसलाय😡.
एकंदरीत फेसबुकवर चमकोगिरी करणारे लेख आणि त्यांचे लेखक यांना पुस्तकात स्थान मिळाल्यामुळे किमान तेवढे तरी वाचक पुस्तकाला मिळाले असतील ही अपेक्षा. माझी पुस्तकाकडून जी अपेक्षा होती ती मात्र पूर्ण झाली नाही 🙄😒😐.
बाकी फेसबुकवर साबुदाणा खिचडीत अंडे घालून खाणाऱ्या (मेंदू चेचून घ्यावासा वाटतोय फेम) किंव्हा गुन्हे छाताडावर घेणारे आमचे समाजसुधारक मित्र यांना मी कट्टर नास्तिक समजत होतो, वो तो ड्युप्लिकेट नास्तिक निकले 😒. त्यांना पुस्तकात स्थान दिलेले नाहीये.
या पुस्तकात कुठेही विवादास्पद, हिंदू धर्मास, जातीस, वंशास दुखवेल असे काहीही लिहिले नाहीये याबद्दल संपादक प्राजक्त अतुल यांचे कौतुक.

No comments:
Post a Comment