Sunday, November 2, 2025

#५ मृत्यू जगलेला माणूस - लेखक रेखा बैजल

#marathibookreview

नुकतेच मराठी प्रमाण भाषा (शुद्धलेखन) नियम रद्द करण्याविषयी शासन दरबारी कोणी तरी दळवी नावाच्या सुट्ट्या व्यक्तीने निवेदन दिले आणि आपल्या शासनाने ते अंमलबजावणीसाठी साहित्य परिषदेकडे पाठवले.🫡

हे नक्कीच विदर्भ किंव्हा मराठवाड्यातील लोकांचे काम असणार असे माझ्या मनात आले. कारण विदर्भ - मराठवाड्यातील लेखक कायम पुण्यामुंबईच्या वाचकांनी आम्हाला वंचित ठेवलं अशी भावना बाळगून असतात. 

असो, पण हे काही खरं नाही. रेखा बैजल या जालन्यातील अत्यंत प्रतिभावान लेखिका आहेत. त्यांचे "मृत्यू जगलेला माणूस" हे दर्जेदार पुस्तक वाचले आणि चांगला लेखक कादंबरीतून किती परिणामकारक आणि ताकदवान लिहू शकतो हे समजले.

माझ्यासारखाच एक सणकी माणूस जीवनाला बोअर झाला म्हणून इच्छामरण घेणार असे जाहीर करतो इथून या कादंबरीची सुरवात होते. मग त्याची जैन धर्मात इच्छेविरुद्ध लग्न करून गेलेली लेक घरी येते आणि जैन धर्मातील पवित्र अशी "संथारा" कॉन्सेप्ट बापाला (म्हणजे वाचकांनाच म्हणा😁) समजावून सांगते. १४० पानांचे हे पुस्तक वाचक खाली ठेऊच शकणार नाही इतकी प्रभावी मांडणी लेखिकेने केली आहे. संथारा आणि इच्छामरण यातला फरक तर समजतोच, पण त्यापलीकडे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन संथारा तुम्हाला दाखवेल.
जबरदस्त पुस्तक !!!

No comments:

Post a Comment