#marathibookreview #8/2025
"नेहरूंच्या ११५ घोडचुका" हे पुस्तक जर माझ्या हाती ५ - ७ वर्षांपूर्वी लागले असते, तर राकु, गोखले, दीक्षित, गौरव पवार टाईप IT Cell च्या पोरांना मोबाईलची धूळ पुसायला ठेवले असते, इतका खजाना या पुस्तकात भरलेला आहे😎💪🏼. लवकरच अजरामर होऊ घातलेल्या या पुस्तकात नेहरूंना लेखकाने तुडव तुडव तुडवला आहे.🫨🫨 दोन पाच फळकुटं गांधीजींना देखील फेकून मारली आहेत. माउंटबॅटनची तर सुरेश ढसांच्या खोक्याने बॅटीने एकाला मारला, त्या लेव्हलची धुलाई केली आहे या पुस्तकात.
सरदार पटेल, मौलाना आझाद, डॉ प्रसाद, सुभाषचंद्र बोस, बाबासाहेब आंबेडकर, रफी किडवाई, जिना, लियाकत अली, राजाजी अशा अनेक त्याकाळच्या नेते, विचारवंत, सनदी आणि सैन्य अधिकारी आदी लोकांनी लिहिलेली पुस्तके, नोंदी आणि पत्रे इत्यादींच्या सखोल अभ्यासानंतर, लेखकाने नेहरूंच्या ११५ चुका अत्यंत त्वेषाने मांडल्यात. सरदार पटेलांनी निवड झाली असताना मागे हटून नेहरूंच्या गळ्यात पंप्र पदाची माळ गळ्यात घातली आणि त्यांच्या इतर अनेक निर्णयांना, प्रस्तावांना, अँटी समाजवादी विचारांना नेहरूंनी कात्रजचा घाट दाखवला असे पुस्तकात वाचण्यात आले...पण यावरून लोहपुरुष हे 'टॉप लीडर' होण्यास योग्यतेचे नव्हते असेच माझे मत झाले. त्यापेक्षा आपले मोदीशा असते, तर नेहरू - गांधीना मार्गदर्शक मंडळात बसवून दर १४ नोव्हेंबरला 'भाई का बड्डे' सांगून फोटो काढले असते...वर आंबेडकरांकडून नवीन घटना (मनुस्मृती आधारित) आधीच लिहून घेतली असती😒.
असो, लेखक रजनीकांत पुराणिक यांनी जीव तोडून हे ५२७ पानांचे नक्कीच असे वाचनीय पुस्तक लिहिले आहे. वाचकांना नेहरूंच्या चुका (ज्या स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्याच चुका समजल्या जातात/जातील) वाचताना खूपच वेदनादायी वाटतात, नेहरूवादाचा राग येईल आणि भारतासाठी हळहळ देखील वाटेल इतक्या प्रभावीपणे नेहरूंच्या चुकांची पुराव्यासह मांडणी केली आहे.
अर्थात बाकी काही असो, तीन वेळा या "अनभिज्ञतेच्या नवाबाला" आपण भारतीय जनतेनेच तर निवडून दिलंय हे विसरून कसे चालेल !!

No comments:
Post a Comment