एकवेळ संजय रौतांची पत्रकार परिषद पहा, गेला बाजार अनन्या पांडेचा अभिनय सहन करा..😖😖 पण "गॉगल लावलेला घोडा"हे पुस्तक कृपा करून वाचू नका. 🥴🥹. कुठून अवदसा आठवली आणि मी अमूर्त संकल्पनेतील (abstract) हे २३६ पानांचे पुस्तक वाचले राव😭😭. मराठीत अमूर्त लेखन करण्याचा कोणी याआधी प्रयोग केल्याचा माझ्या माहितीत नाही, म्हणूनच कुतूहलापोटी हे पुस्तक उचलले.
पुस्तकातील सर्व नऊ कथांमध्ये लेखक निखिलेश चित्रे समांतर विश्वात घेऊन जातो आणि तिकडे पुढे काहीच होत नाही... कारण तिकडे काहीच नसते. 🫤🫤. छे... का हे आतार्किक पुस्तक मी वाचले!😒😒. मराठी भाषा लुप्त झालीच तर अशा पुस्तकांमुळेच होईल😡😡. एकंदरीत गॉगल लावणारा घोडा बघण्याचा नादात लेखकाने वाचकांनाच घोडा लावलाय अशी परिस्थिती आहे!! मेबेंडाझोल सिरप प्यावे लागणारे आता मला..😭😖😵💫🫨🤢🤒

No comments:
Post a Comment