#BookReview4/2025 #रारंग ढांग"
चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांच्या मुलाचे प्रभाकर पेंढरकरांचे "रारंग ढांग" हे खूप जुने पुस्तक वाचून काढले. भारताची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हिमालयात अत्यंत उंचीच्या आणि बिकट नैसर्गिक परिस्थितीत रस्ते बांधण्याचे काम अनेक दशके करत आहे. या रस्ता बांधणीतील सर्वात अवघड भाग म्हणजे हिमालयाच्या उभ्या कड्यामधून खोदून रस्ता काढायचा आहे. या नितळ, उभ्या कड्यांना स्थानिक भाषेत "ढांग" म्हटले जाते. हे १६८ पानी पुस्तक हिमालयातील दुर्गम नैसर्गिक परिस्थिती आणि त्यावर आपल्या अगम्य इच्छाशक्तीच्या जोरावर झुंज देणाऱ्या लेफ्टनंट विश्वास मेहेंदळे यांच्या नैतिक पराभवाची तात्विक मीमांसा करते. आर्मी मधल्या मेजर, कर्नल, लेफ्टनंट, सुभेदार यांच्यातील संवाद आपल्याला नकळत किन्नोर हिमालयाच्या आसपास तळ ठोकणाऱ्या आर्मी लाईफ जगायला देते. मेजर बंबांचं "यू ब्लडी सिव्हिलियन" हे लेफ्टनंट विश्वनाथला संबोधणे, जाता येता रम - व्हिस्कीचे पेग भरणे आणि इतरही अनेक संवाद इंग्रजळलेल्या इंडियन आर्मीचा अंतरंग दाखवते. विश्वनाथला पत्र लिहिणारी चित्रकार उमा, कॅप्टन मीनूचे नवीन दिल शांतारानी, सर्जेरावची लग्नाआधीच अकस्मात विधवा झालेली पारू, परवानगी शिवाय स्मृतीस्तंभ उभा केल्याबद्दल कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागलेला तरुण लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे प्रत्येक प्रसंग पुस्तकात नजरेसमोर आणण्याइतका सुरेख रेखाटला आहे.

No comments:
Post a Comment