#marathibookreview #19/2025
"न्या. लोयांचा खुनी कोण?" ही आमचे लाडके पत्रकार लेखक निरंजन टकले (अकबराने कुंभ मेळा चालू केला फेम) यांनी अतिशय सुरेख रचलेली कथा वाचली. शोधपत्रकाराचा प्रवास गुप्तहेर कथेपर्यंत येत येत द वीक मधली नोकरी गेल्यानंतर कारवान नावाच्या नियतकालिकात नोकरी मिळाली नाही या बेरोजगार दुःखावर येऊन थांबते. खरं तर १३६ व्या पानापर्यंत उत्कंठा ताणणाऱ्या या कथेत नंतर काहीही तथ्य नाहीये हे वाचकांना उलगडतेच. पण तरीही पुस्तकाची पाने भरण्यासाठी लेखकाने कथेत रंग भरण्याचा चांगला प्रयत्न केलाय, शेवट सर्वांनीच धनकवडीच्या शेरलॉक टकलेंची साथ सोडली, त्यामुळे माहेरची साडी टाइप डी एंड झाला😐😐.
मुग्धा कर्णिक (मेंदू चेचून घ्यावासा वाटतोय फेम) यांनी या पुस्तकाचा उत्कृष्ट अनुवाद केलाय, त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक. पण "इंग्रजी नीटसे समजत नाही, पकड घेत नाही म्हणून मराठीतच वाचणाऱ्या वाचकांसाठी..." हे पुस्तक अनुवाद केल्याचे मुग्धा कर्णिक सांगतात 😭😭. यायला, आय कॅन टॉक अँड वॉक इन फाडफाड इंग्लिश😡😡.
३४४ पानांच्या या पुस्तकात न्या. वी रमण, भारताचे सुप्रीम कोर्ट, भाजप, सावरकर, रा स्व संघ, अण्णा हजारे, केजरीवाल, ट्रोल गँग, न्या मोडक - न्या कुलकर्णी, तेहसीन पूनावाला, एबीपी माझा, प्रसन्न जोशी इत्यादी सर्वांनी उगाचच मार खाल्लाय .
बाकी पुस्तकात वैभव छाया हे शोषण मिडियावर वादग्रस्त लिहिणारे कॅरेक्टर उगाच घुसडले आहे. लेखक मारवाडी आणि ब्राह्मण समाजाला घाबरट म्हणताय, पण पुस्तकात तुमची ही "स्टोरी" कव्हर केल्यानंतर कोण घाबरट आहे, ते वाचकांना समजून जातेच😃.
त्यामुळे माझा आदरणीय टकले सरांना हा प्रेमाचा सल्ला -
तुम्ही अत्यंत चांगले पटकथाकार होऊ शकता... सोडा हे झोळीघाले धंदे आता, सोडा ती "दरोडेखोर" मुंबईतली भाड्याची सिंगल रूम!... न्या झोया वर्ग्रे नावाने अशीच एक कहाणी लिहा, जोहर किंव्हा कश्यपला विका, पैशे छापा ...माझ्यासारखेच हस्तिदंताच्या मनोऱ्यातून चिकन लॉलीपॉप खात हजारे - जरांगे पाटलांच्या उपोषणास पाठिंबा द्या.😎 प्रेम गांधीजींवर करा.. उद्या ते म्हणाले औरंगजेबाचा फोटो नोटेवर, तर आपण टोपी फिरवायची. शेवटी ज्याच्या हाती लाठी, त्याची धरावी काठी😝😝

No comments:
Post a Comment