#marathibookreview
"दुनिया कहती है मुझको पागल, मैं कहता दुनिया को पागल" (~ किशोर कुमार)
असाच होता किशोर दा 😀. "आवाजाचा अवलिया किशोर कुमार" या नव्या पुस्तकात लेखक सुहास किर्लोस्कर यांनी किशोर कुमारच्या (त्यांच्या फेव्हरेट) २५ गाण्यांचे विश्लेषण केले आहे. किशोर कुमार म्हणाल्यावर त्याच्याशी संदर्भातल्या धमाल किस्से कहाण्या असल्याच पाहिजेत, त्याची लेखकाने ११६ पानी या पुस्तकात काळजी घेतली आहे.
निर्मात्याने अर्धे पैसे दिले म्हणून अर्धी दाढी करून जाणाऱ्या किशोरच्या दर्दभऱ्या गाण्यात क्लासिकल संगीतातले नियम कसे पाळले गेले आहेत किंव्हा बदलले गेले आहेत याचा लेखाजोखा लेखक मांडतो.
खरं तर २९११ गाणी गाणारा आभास गांगुली उर्फ किशोर कुमार हा पीएचडीचा विषय आहे असे मला वाटते. मी लेखक असतो तर फक्त हाफ तिकीट चित्रपटावर एक पुस्तक लिहून काढले असते😃. लेखकाच्या २५ गाण्यात "मजबूर" चित्रपटातले "आदमी जो केहता है, आदमी जो सुनता है..." हे गाणे असल्याने आनंद वाटला. तशी किशोरदाची १०० एक गाणी लेखकाने नमूद केली असतील पुस्तकात, पण "मेरे मेहबूब कयामत होगी..." हे गाणे असायला हवे होते असे वाटते.
किशोर कुमारचा आदर्श अमेरिकन विनोदी अभिनेता डॅनी काये यांच्याविषयी सगळेच थोडी माहिती देतात, पण कोणीतरी यावर विस्तृत माहिती द्यायला पाहिजे... कदाचित अमित कुमारला नक्की माहिती असावी त्यांच्या दोघांमधली दोस्ती.
किशोर फॅन्ससाठी हे पुस्तक नक्कीच आनंददायी आहे!

No comments:
Post a Comment