#bookreview #6/2025 #१६९५ स्मार्ट रोबो, एआय आणि औरंगजेब
"नेहरूंच्या ११५ घोडचुका" हे येत्या काळात लवकरच अजरामर होणारे पुस्तक वाचताना जरा डोक्याच्या तवा गरम झाला, त्यावर ब्रेक म्हणून " १६९५ स्मार्ट रोबो, एआय आणि औरंगजेब" हे १४५ पानांचे छोटेखानी पुस्तक वाचून काढले.
सन १६९५ मध्ये मुघल सम्राट औरंगजेबाच्या ' जंग - ई सवाई ' हे अफाट संपत्ती वाहून नेणारे हज - सुरत मार्गावरचे जहाज हेन्री अव्हेरी या इंग्रज समुद्री चाच्याने लुटले. आलमगीर यामुळे प्रक्षुब्ध झाला, पण तरी पण त्याने या जहाजाचा आणि अव्हेरीचा शोध घेण्याचा फारसा रस दाखवला नाही!! नक्की काय झालं सप्टेंबर १६९५ साली??, या उत्सुकतेपोटी टिल्लू रंगनाथ रणखांबे या किशोरवयीन मुलाने मशीन लॉर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून शोध घ्यायचा ठरवला, असे विलक्षण कथासूत्र आहे या कादंबरीत. या कामात त्याला शोधकार्य चालू असताना कैलासवासी झालेला रोबो ' स्पॉट ', महाजालातील औरंगजेब विषयावरची लाखो पाने - माहिती (जी कृत्रिम बुद्धिमत्तेने रोबो, अलेक्सा हे क्षणात वाचून काढतात) आणि टिल्लूचे वडील कॉम्प्युटर शास्त्रज्ञ वडील मदत करतात.
लेखक सुरेश वांदिले यांनी बाजीराव गुप्तेंचा अपघात, पोलिस तपास हे कथानकात घुसडल्याने पुस्तक फसेल असे वाटत असतानाच शेवटला गरकन गाडी रुळावर आणली आहे. कथा १२५ पानापर्यंत उत्कंठा जागृत ठेवते हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य.
नवीन पुस्तक आहे, मुखपृष्ठ, कागदाची गुणवत्ता राजहंस प्रकाशनाचे असल्याने चांगली ठेवली आहे.
मजा आली... आता जातो नेहरूंच्या मागे परत😾🫨🫤😾😾🏃🏽🏃🏽

No comments:
Post a Comment